महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 12, 2020, 5:32 PM IST

ETV Bharat / sports

मार्कस स्टॉयनिसची बिग बॅग लीगच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी

बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्टॉयनिसने स्टार्स संघाकडून खेळताना ही खेळी केली. सिडनी सिक्सर्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मार्कस स्टॉयनिस आणि हिल्टन कार्टराइट या सलामीवीर जोडीने २०० धावांची सलामी दिली.

Marcus Stoinis hits highest ever Big Bash League score as records tumble at the MCG
मार्कस स्टॉयनिसची केली बिग बॅग लीगच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसने बिग बॅश लीगमध्ये ताबडतोड खेळी करत इतिहास रचला. त्याने या लीगमध्ये सर्वाधिक धावांची खेळी साकारली. स्टॉयनिसने ७९ चेंडूत १४७ धावांची नाबाद खेळी केली.

बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्टॉयनिसने स्टार्स संघाकडून खेळताना ही खेळी केली. सिडनी सिक्सर्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मार्कस स्टॉयनिस आणि हिल्टन कार्टराइट या सलामीवीर जोडीने २०० धावांची सलामी दिली.

हिल्टनने ४० चेंडूत ५९ धावा केल्या. तर स्टॉयनिसने ७९ चेंडूत नाबाद १४७ धावा चोपल्या. यामध्ये १३ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश आहे. या खेळीनंतर स्टॉयनिस बिग बॅश लीगमध्ये सर्वोच्च खेळी करणारा फलंदाज ठरला. या आधी ७ व्या हंगामात डार्सी शॉर्ट याने १२२ धावांची नाबाद खेळी केली होती.

हेही वाचा -बुमराहला यंदाचा 'पॉली उम्रीगर' पुरस्कार, तर पूनम यादव ठरली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

हेही वाचा -विश्व करंडकातील पराभवाबाबत धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला मला या गोष्टीचा...

ABOUT THE AUTHOR

...view details