महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात... आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला', सचिनचे 'माय मराठी'बद्दल ट्विट - सचिन तेंडुलकर न्यूज

अनेक राजकीय नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी आज मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही देखील खास मराठीत ट्विट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

marathi bhasha gaurav din sachain tendulkar wishes marathi speaking people
'भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात... आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला', सचिनचे 'माय मराठी'बद्दल ट्विट

By

Published : Feb 27, 2021, 6:41 PM IST

मुंबई - कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. आज या दिनाच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही देखील खास मराठीत ट्विट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकरने आज मराठी दिनाच्या निमित्तानं मराठीतून ट्विट केलं आहे. भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेची मजा वेगळी आहे. मी लहानाचा मोठा मुंबईतील 'साहित्य सहवास' सोसायटी मध्ये झाल्याने मराठी भाषेचे संस्कार आपोआप होत गेले आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला. मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, असे ट्विट करुन सचिनने माय मराठीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिनने शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करणाऱ्या पॉपस्टार रिहानाला उत्तर देणारे ट्विट केले होते. यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती. अनेकांनी सचिनने शेतकरी आंदोलनाविरुद्ध एकप्रकारे सरकारचे समर्थन केल्याचा आरोपही केला होता.

हेही वाचा -India Women vs South Africa Women : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

हेही वाचा -भारतीय महिला क्रिकेटची वापसी; BCCI कडून वेळापत्रक जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details