दुबई -आयपीएलच्या तिसर्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादच्या दिशेने झुकलेला हा सामना युझवेंद्र चहलने बंगळुरूच्या बाजुने फिरवला. मात्र, सनरायझर्सचा फलंदाज मनीष पांडेसाठी हा सामना खास राहिला.
आयपीएल २०२० : पराभूत झालेल्या हैदराबादच्या मनीष पांडेने केला खास विक्रम - manish pandey record news
मनीष पांडेने एक खास विक्रम नोंदवला आहे. टी-२० क्रिकेटमधील आठ डावानंतर पांडे पहिल्यांदाच बाद झाला आहे. याआधी त्याने २१७ धावा काढल्या आहेत. त्याने मागील आठ डावात ३४, ११, ५०, १४, १४, ३१, ६०, ३ नाबाद धावा केल्या आहेत.
![आयपीएल २०२० : पराभूत झालेल्या हैदराबादच्या मनीष पांडेने केला खास विक्रम manish pandey made a special record in his opening match of ipl 2020](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8894318-683-8894318-1600768335571.jpg)
सामन्यादरम्यान मनीष पांडेने एक खास विक्रम नोंदवला आहे. टी-२० क्रिकेटमधील आठ डावानंतर पांडे पहिल्यांदाच बाद झाला. याआधी त्याने नाबाद २१७ धावा काढल्या होत्या. त्याने मागील आठ डावात ३४, ११, ५०, १४, १४, ३१, ६०, ३ अशा नाबाद धावा केल्या आहेत. आरसीबीने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मनीष मैदानावर उतरला. त्याने ३३ चेंडूत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. नवदीप सैनीने त्याला माघारी धाडले.
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कल आणि एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ १९.४ षटकांत १५३ धावांवर सर्वबाद झाला. युझवेंद्र चहलने ३, तर शिवम दुबे आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सोबतच डेल स्टेनने १ विकेट घेतली.