लंडन - क्रिकेटच्या इतिहासात 'नकोसा विक्रम' असलेले इंग्लंडचे माजी गोलंदाज मॅल्कोल्म नॅश यांचे वयाच्या 74 व्या वर्षीय निधन झाले. मॅल्कोल्म यांच्या नावे एक असा रेकार्ड आहे, जे कोणताही गोलंदाज आपल्या आठवणीत ठेऊ इच्छिणार नाही. 1968 साली कौंटी क्रिकेटच्या एका सामन्यात मॅल्कोल्म यांच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू गॅरी सोबर्सने सहा चेंडूत सहा षटकात ठोकले होते.
6 चेंडूत 6 षटकार देणाऱ्या इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचे निधन
लंडन येथील लॉर्ड्समध्ये मॅल्कोल्म नॅश डिनर करताना खाली पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 1966 ते 1983 या कालावधीत खेळताना मॅल्कोल्म यांनी 336 प्रथम श्रेणी सामन्यात 993 गडी बाद केले आहेत. महत्वाचे म्हणजे मॅल्कोल्म यांनी गोलंदाजी सोबत फलंदाजीमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. त्यांनी 469 डावांमध्ये फलंदाजी करताना 7129 धावा जमवल्या.
लंडन येथील लॉर्ड्समध्ये मॅल्कोल्म डिनर करताना खाली पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 1966 ते 1983 या कालावधीत खेळताना मॅल्कोल्म यांनी 336 प्रथम श्रेणी सामन्यात 993 गडी बाद केले आहेत. महत्वाचे म्हणजे मॅल्कोल्म यांनी गोलंदाजी सोबत फलंदाजीमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. त्यांनी 469 डावांमध्ये फलंदाजी करताना 7129 धावा जमवल्या.
दरम्यान, मॅल्कोल्म यांना गॅरी सोबर्स यांनी सहा चेंडूत सहा षटकार ठोकल्यानंतर नॅश यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळाली.