महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सौराष्ट्राने जिंकले रणजीचे पहिलवहिले विजेतेपद - रणजी २०२० अंतिम सामना न्यूज

मागील ८ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल ४ वेळा रणजीची अंतिम फेरी गाठली होती, मात्र या त्यांना अपयश आले होते. पहिल्या डावाच्या आघाडीवर सौराष्ट्राने बंगालला मात दिली आहे.

Maiden Ranji Trophy title for Saurashtra
सौराष्ट्राने जिंकलं रणजीचं पहिलवहिलं विजेतेपद

By

Published : Mar 13, 2020, 3:57 PM IST

Updated : Mar 13, 2020, 6:15 PM IST

राजकोट - बंगालची दुसऱ्या डावात कोंडी करत सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्राने अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेत जेतेपदाचे स्वप्न साकारले. मागील ८ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल ४ वेळा रणजीची अंतिम फेरी गाठली होती, मात्र या त्यांना अपयश आले.

हेही वाचा -आता आयपीएल 'या' तारखेपासून, बीसीसीआयचा मोठा निर्णय

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या सौराष्ट्राने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या. या डावात अर्पित वसावडाने २८७ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. त्याचे या हंगामातील लागोपाठ दुसरे, तर कारकिर्दीतील ७ वे शतक ठरले. पुजाराने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील ६० वे अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात बंगालकडून अक्षदीपने ४, शाहबाज अहमदने ३, मुकेश कुमारने २ तर इशान पोरेलने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल बंगालनेही चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला सुदीप चॅटर्जी, यानंतर वृद्धीमान साहा, अनुस्तुप मुजुमजार यांनी अर्धशतकी खेळी करत बंगालची धावसंख्या ३८१ धावांपर्यंत नेली. अखेरच्या फळीत अर्नब नंदीने ४० धावांची खेळी करत चांगली झुंज दिली, मात्र अखेरच्या दिवशी सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने इशान पोरेलला माघारी धाडत सौराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. या आघाडीवर सौराष्ट्राने विजय मिळवला. पहिल्या डावात शतक झळकावणारा सौराष्ट्रचा अर्पित वसावडा सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक -

  • नाणेफेक - सौराष्ट्र
  • सौराष्ट्र पहिला डाव - १७१.५ षटकात सर्व बाद ४२५
  • बंगाल पहिला डाव - १६१ षटकात सर्व बाद ३८१
  • सौराष्ट्र दुसरा डाव - ३४ षटकात ४ बाद १०५* (सामना अनिर्णीत, पहिल्या डावाच्या आघाडीवर सौराष्ट्र विजयी)
Last Updated : Mar 13, 2020, 6:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details