चेन्नई -इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) नवा हंगाम १५ एप्रिलपर्यंत तहकूब झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघाचे वेळापत्रक सोडून चाहत्यांना भेटताना दिसला. सीएसकेने धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो चाहत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे.
हेही वाचा -बीसीसीआयने केलेल्या हकालपट्टीनंतर मांजरेकरांनी तोडले मौन, म्हणाले...
कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्स संघाने सराव सत्र स्थगित केले. सीएसकेने २ मार्चपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रशिक्षण सुरू केले होते. कोरोनामुळे अनेक स्पर्धांमध्ये प्रेक्षकांशिवाय सामने होत असले तरी, सीएसकेचे सराव सत्र पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर चांगलीच गर्दी केली होती.
'कोविड-१९ पासून उद्भवलेल्या परिस्थितीला पाहून चेन्नई सुपर किंग्जचे एमए सत्र १४ मार्चपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर स्थगित केले जाईल', असे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आर. एस. रामास्वामी म्हणाले होते.
चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. या विषाणूमुळे जगभरातील ५ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही याचा प्रसार झाला असून १०० हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या विषाणूच्या फैलावामुळे अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत.