मुंबई -भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. आज सायंकाळी ७:२९ पासून आपल्याला निवृत्त समजण्यात यावं असे धोनीने म्हटले आहे. धोनीने २०२१ च्या वर्ल्डकपच्या आधीच निवृत्ती घेतल्याने तो विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही याला पूर्णविराम मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या तुफानी खेळीने व विशेषत: हेलिकॉप्टर शॉटने क्रिकेट रसिकांच्या मनावर गारुड निर्माण केले होते.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.
धोनीने आपल्या कारकीर्दीत भारतासाठी २००७ चा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक आणि कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला अव्वलस्थान मिळवून दिले होते. याच कालावधीत कर्णधार म्हणून धोनीने यशाचे शिखर गाठले होते. त्याच वेळी जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून धोनी नावारुपाला आहे. त्याने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले