महाराष्ट्र

maharashtra

BCCI ची कोंडी, IPL २०२० विषयावर उच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

By

Published : Mar 12, 2020, 3:58 PM IST

Updated : Mar 12, 2020, 4:35 PM IST

भारतामध्ये २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा होणार आहे. कोरोनाचा धोका पाहता, या स्पर्धेला परवानगी देऊ नका, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर २३ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने BCCI ला दिले आहेत.

Madras High Court asks BCCI to reply by March 23 on a PIL to cancel Indian Premier League (IPL) matches between March 29 & May 24 due to Coronavirus
BCCI अडचणीत, IPL २०२० विषयावर उच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

मुंबई- चीनपासून जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे ७२ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अशात २९ मार्चपासून भारतामध्ये आयपीएल स्पर्धा होणार आहे. कोरोनाचा धोका पाहता, या स्पर्धेला परवानगी देऊ नका, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर २३ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने BCCI ला दिले आहेत.

वकील जी अ‌ॅलेक्स बेंझीगर यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात उच्च न्यायालयाने २३ मार्चपर्यंत BCCI कडून या प्रकरणी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाची त्यांची भूमिका काय, हे विचारले आहे.

काय आहे बेंझीगर यांची याचिका -

जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO) च्या अधिकृत्त वेबसाईटवरील माहितीनुसार, अजूनपर्यंत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्र सरकारने बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी बेंझीगर यांनी आपल्या याचिकेत केली आहे. इटली फुटबॉल फेडरेशन लीगने देशात होणारे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही, बेंझीगर यांनी याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. याचे सावट अनेक क्रीडा स्पर्धांवर आहे. चीनमधील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच चीनी खेळाडूंना भारतासह अनेक देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनामुळे संकटात सापडलेली आहे. तर आयपीएलवरही टांगती तलवार आहे. आगामी काळात आयपीएलसंदर्भात काय भूमिका घेतली जाते, हे पाहावे लागेल.

हेही वाचा -IND vs SA १st ODI : ...तरच २०-२० षटकाचा होणार सामना

हेही वाचा -NBA लीगमधील खेळाडूला कोरोनाची लागण, संपूर्ण स्पर्धाच केली रद्द

Last Updated : Mar 12, 2020, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details