महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर - बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समिती न्यूज

बीसीसीआयच्या निवेदनानुसार या सीएसीची मुदत एक वर्षाची असेल. नवीन मुख्य निवडक एमएसके प्रसाद आणि निवड समिती सदस्य गगन खोडा यांच्या जागी नवीन नेमणुका करणे हे नव्या सीएसीचे पहिले काम असेल.

Madan Lal, RP Singh, Sulakshana join BCCI's new CAC
‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर

By

Published : Feb 1, 2020, 8:13 AM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी आपली नवीन क्रिकेट सल्लागार समिती जाहीर केली. तीन सदस्यांच्या समितीत मदन लाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांचा समावेश आहे.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपन : ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम अंतिम फेरीत, आता झुंज जोकोविचशी

बीसीसीआयच्या निवेदनानुसार या सीएसीची मुदत एक वर्षाची असेल. नवीन मुख्य निवडक एमएसके प्रसाद आणि निवड समिती सदस्य गगन खोडा यांच्या जागी नवीन नेमणुका करणे हे नव्या सीएसीचे पहिले काम असेल.

देशाच्या विविध संघांचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारीसुद्धा क्रिकेट सल्लागार समितीकडेच असते. गतवर्षी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.

सुलक्षणा नायक -

सुलक्षणा नायक यांनी भारताचे ११ वर्षे प्रतिनिधित्व केले असून त्यांना २ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे.

मदनलाल -

मदनलाल यांना ३९ कसोटी आणि ६७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असून ते १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. भारताचे माजी प्रशिक्षक तसेच वरिष्ठ गटाच्या निवड समितीचे माजी सदस्य.

आर. पी. सिंग -

रूद्र प्रताप सिंग म्हणजेच आर.पी.सिंगला १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामन्यांचा अनुभव. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या संघाचा सदस्य.

ABOUT THE AUTHOR

...view details