महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेसाठी खुशखबर, लुंगी एनगिडीचे होणार टीममध्ये पुनरागमन - icc cricket world cup

आयसीसी विश्वकरंडकाच्या सध्याच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका सातव्या स्थानी आहे.

लुंगी एनगिडीचे होणार टीममध्ये पुनरागमन

By

Published : Jun 17, 2019, 11:58 PM IST

लंडन -दक्षिण आफ्रिका टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो पूर्णपणे तंदुरस्त झाला आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेतील पुढील सामन्यात तो संघनिवडीसाठी उपलब्ध असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना १९ जूनला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

लुंगी एनगिडीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यापूर्वीच दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज डेल स्टेन विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे महत्वाचे २ गोलंदाज संघात नसल्याने आफ्रिकेला यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये बराच तोटा सहन करावा लागला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details