नवी दिल्ली - कोरोनाच्या कठीण काळात गरजूंना मदत करण्यासाठी भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुलने २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या बॅटचा लिलाव केला आहे. या बॅटचा लिलाव २,६४,२२८ रुपयांमध्ये झाला आहे.
राहुलच्या वर्ल्डकप बॅटचा झाला लिलाव, मिळाली ‘इतकी’ किंमत - kl rahul latest news
राहुलने आपल्या बॅटशिवाय आपल्या ब्रँड ‘गली’समवेत इतर वस्तूंचा लिलावही केला आहे. या लिलावाचे पैसे ‘अवेयर’ फाऊंडेशनकडे जातील. या निधीमुळे कोरोना संकटादरम्यान अडचणीत संघर्ष करणार्या लोकांना मदत होईल.
राहुलच्या वर्ल्डकप बॅटचा झाला लिलाव, मिळाली ‘इतकी’ किंमत
राहुलने आपल्या बॅटशिवाय आपल्या ब्रँड ‘गली’समवेत इतर वस्तूंचा लिलावही केला आहे. या लिलावाचे पैसे ‘अवेयर’ फाऊंडेशनकडे जातील. या निधीमुळे कोरोना संकटादरम्यान अडचणीत संघर्ष करणार्या लोकांना मदत होईल.
या व्यतिरिक्त राहुलचे हेल्मेट १,२२,६७७ रुपये, त्याचे पॅड्स ३३,०२८ रुपये, एकदिवसीय जर्सी १,१३,२४० रुपये, टी-२० जर्सी १,०४,८२४ रुपये, कसोटीची जर्सी १,३२,७७४ रुपये आणि ग्लोव्ह्जला २८,७८२ रूपये इतक्या किंमतीमध्ये लिलावामध्ये खरेदी करण्यात आले आहे.