मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल याने आपल्या क्रिकेटच्या वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावाद्वारे मिळणारी रक्कम अवेर फाऊंडेशनला दिली जाणार आहे. लिलावातील वस्तूंमध्ये त्याने 2019च्या विश्वकरंडक स्पर्धेत वापरलेल्या बॅटचा समावेश आहे.
लोकेश राहुल करणार आपल्या बॅटचा लिलाव - लोकेश राहुल बॅटचा लिलाव न्यूज
नुकताच 28वा वाढदिवस साजरा करणारा राहुल म्हणाला, मी भारतीय सैन्याच्या भागीदारीत माझे क्रिकेट पॅड, ग्लोव्हज, हेल्मेट्स आणि माझी जर्सी देण्याचे ठरवले आहे. हे सर्व लिलाव करतील आणि त्याच्या अवेर फाऊंडेशनला निधी देतील. हे फाउंडेशन मुलांना मदत करते. हे माझ्यासाठी खूप विशेष आहे.

लोकेश राहुल करणार आपल्या बॅटचा लिलाव
नुकताच 28वा वाढदिवस साजरा करणारा राहुल म्हणाला, की, मी भारतीय सैन्याच्या भागीदारीत माझे क्रिकेट पॅड, ग्लोव्हज, हेल्मेट्स आणि माझी जर्सी देण्याचे ठरवले आहे. हे सर्व लिलाव करतील आणि त्याच्या अवेर फाऊंडेशनला निधी देतील. हे फाउंडेशन मुलांना मदत करते. हे माझ्यासाठी खूप विशेष आहे.
बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहिमनेही आपला बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशातील कोरोनाविरूद्धच्या युद्धात निधी गोळा करण्यासाठी रहीम आपल्या बॅटचा लिलाव करणार आहे.