महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-२० क्रमवारीत  लोकेश राहुल, कुलदिप यादव टॉप १० मध्ये - T20I

आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारी

lokesh Rahul and Kuldeep Yadav

By

Published : Mar 13, 2019, 2:57 PM IST

दुबई - आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत लोकेश राहुलने फलंदाजीत तर, गोलंदाजीत कुलदिप यादवने अव्वल १० मध्ये स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत लोकेश राहुल चागंली फलंदाजी करत २ सामन्यात ९७ धावा केल्या. त्याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला.

ताज्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत राहुल पाचव्या क्रमाकांवर आहे. तर गोलंदाजीतही कुलदिप यादव पाचव्या स्थानी विराजमान आहे. विशेष म्हणजे फलंदाजीत राहुल तर गोलंदाजीत कुलदिप हे आयसीसच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या १० जणांमध्ये असणारे दोनच भारतीय खेळाडू आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या, पाकचा बाबर आझम पहिल्या आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा ११व्या, शिखर धवन १५व्या आणि भारतीय कर्णधार विराट कोहली १७व्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या यादित राशिद खान अव्वल स्थानी आहे. तर पाकचा शादाब खान दुसऱ्या आणि इंग्लंडचा आदिल रशीद तिसऱ्या स्थानी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details