पोटशेफस्ट्रूम - भारत आणि बांगलादेश यांच्या युवा संघात विश्व करंडक स्पर्धेचा (१९ वर्षांखालील) अंतिम सामना काही वेळात खेळला जाणार आहे. गतविजेता भारतीय संघ या सामन्यासह पाचव्यांदा करंडक उंचावण्यासाठी उत्सुक आहे.
भारतीय युवा संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघही फुल्ल फॉर्मात आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे.