मुंबई-इंग्लंड येथे चालू असलेल्या आयसीसी वनडे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल चर्चेता विषय ठरला आहे. विकेट घेतल्यानंतर आपल्या अनोख्या अंदाजात कोट्रेल जवानाप्रमाणे मैदानावर सॅल्ल्यूट ठोकतो. त्याची ही स्टाईल क्रिकेटविश्वात खूप प्रसिद्ध झाली असून अनेक चाहते ती स्टाईल कॉपी करताना दिसत आहेत. मुंबईतील एका लहान मुलिचा असाच एक कोट्रेल स्टाईलने सॅल्ल्यूट मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
video : मुंबईच्या लहान मुलीने कॉपी केली शेल्डन कोट्रेलची 'सॅल्ल्यूट' स्टाईल - ICC
कॉट्रेल जमैकन सैन्यात असून सैन्याच्या सन्मानार्थ तो सामन्यात सॅल्यूट करतो.

मुंबईच्या लहान मुलिने कॉपी केली शेल्डन कोट्रेलची 'सॅल्ल्यूट' स्टाईल
कॉट्रेल जमैकन सैन्यात असून सैन्याच्या सन्मानार्थ तो हे सॅल्यूट करतो. त्याने वेस्ट इंडिजसाठी २०१३-१४ मध्ये कसोटीत तर २०१५ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. या विश्वकरंडकात खेळताना कॉट्रेलने ७ सामन्यात वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक ११ विकेट घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिजला आतापर्यंत एकाच सामन्यात विजय मिळता आला असल्याने त्यांचे विश्वकरंडकातील आव्हान संपुष्टात आले आहे.