नवी दिल्ली -भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शमीच्या भावाला मुलगी झाली असून त्याने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
क्रिकेटपटू शमीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन - मोहम्मद शमी लिटल एंजल न्यूज
क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या भावाला मुलगी झाली असून त्याने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
क्रिकेटपटू शमीच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन
हेही वाचा -'धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार'
'माझ्या कुटुंबात अजून एकाचे आगमन. राजकुमारी तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. या जगात तुझे स्वागत आहे. भावाला शुभेच्छा', असे शमीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शमी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.