दुबई -डकवर्थ-लुईसचा नियम देणारे गणितज्ज्ञ टोनी लुईस यांच्या मृत्यूबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) शोक व्यक्त केला आहे. लुईस यांचे नुकतेच निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुईस-स्टर्न’पद्धत तयार करण्यात लुईस यांचा मोलाचा वाटा होता.
आयसीसी क्रिकेटचे सरव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस म्हणाले, की क्रिकेटमध्ये टोनी यांचे मोठे योगदान आहे. क्रिकेट खेळातील त्यांच्या योगदानाची नोंद येत्या काही काळातही होईल. आम्ही त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो.