महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women's T20 WC : आम्हाला तुमचा अभिमान... दिग्गजांकडून टीम इंडियावर शुभेच्छा वर्षाव - महिला क्रिकेट

हरमनप्रीतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला. तेव्हा भारतीय संघाच्या अंतिम प्रवेशानंतर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

legends react as indian womens team qualify for their first t-20 world cup finals
Women's T20 WC : आम्हाला तुमचा अभिमान...दिग्गजांकडून टीम इंडियावर शुभेच्छा वर्षाव

By

Published : Mar 5, 2020, 12:48 PM IST

मुंबई- भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताने अ गटात ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि याच जोरावर हरमनप्रीतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला. भारतीय संघाच्या अंतिम प्रवेशानंतर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विरेंद्र सेहवाग -

'उपांत्य फेरीचा सामना झाला असता, तर पाहायला आवडले असते, परंतु देवासमोर कोण जिंकू शकतं? मेहनतीचे फळ मिळते. अ गटातील सर्व सामने जिंकल्याचा फायदा भारतीय संघाला झाला. त्यांचे खूप खूप अभिनंदन.'

व्हीव्हीएस लक्ष्मण -

'सामना झाला असता तर पाहून आनंद झाला असता. परंतु...अंतिम सामन्यात प्रवेश केल्याबद्दल महिला संघाचे अभिनंदन. साखळी फेरीतील ४ पैकी ४ सामने जिंकण्याचे बक्षीस मिळाले. अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.'

विराट कोहली -

'महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे असून तुम्हाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.'

ABOUT THE AUTHOR

...view details