दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमेरिकेचा फिरकीपटू निसर्ग पटेलला पुन्हा गोलंदाजीची परवानगी दिली आहे. पटेलची गोलंदाजीची शैली वैध सिद्ध झाल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
११ फेब्रुवारी, २०२० रोजी आयसीसी विश्वकप लीग २च्या सामन्यात पटेलची गोलंदाजी संशयास्पद असल्याचे दिसून आले. तेव्हापासून त्याच्या गोलंदाजीवर बंदी होती. हा सामना काठमांडू (नेपाळ) येथे ओमानविरुद्ध खेळवण्यात आला होता.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : दुसऱ्या कसोटीसाठी पाहुण्यांचा संघ जाहीर, ब्रॉड परतला
आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, एका तज्ञ पॅनेलने पटेलच्या रीमॉड बॉलिंग अॅक्शनच्या व्हिडिओ फुटेजचा अभ्यास केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या गोलंदाजीची शैली दोनदा अवैध ठरवण्यात आली होती.
३२ वर्षीय निसर्ग पटेलने अमेरिकेसाठी आतापर्यंत ८ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ७ आणि ५ बळी घेतले आहेत.