नवी दिल्ली - माजी भारतीय फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने चार दिवसांच्या कसोटी सामन्याची कल्पना नाकारली आहे. खेळाचे प्रारूप कमी केल्यास त्याचा अपेक्षित निकाल लागण्याची शक्यताही कमी होईल. मी चार दिवसांच्या क्रिकेट कसोटी सामन्यास कसलीही पसंती देत नाही. पाच दिवस या स्वरूपामध्ये योग्य बसतात कारण जास्त निकाल लागतात, असे लक्ष्मणने म्हटले.
चार दिवसीय कसोटी सामन्याला लक्ष्मणचा नकार - vvs laxman latest news
एका वाहिनीवरील कार्यक्रमात लक्ष्मणने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''याशिवाय यासंदर्भात आणखी एक बाजू आहे आणि ती म्हणजे नाणेफेक. जो संघ दौऱ्यावर असतो तो विजयी व्हावा ही आमची अपेक्षा असते. त्यामुळे चाहत्यांसाठी हा खेळ अधिक मनोरंजक बनतो. "
चार दिवसीय कसोटी सामन्याला लक्ष्मणचा नकार
एका वाहिनीवरील कार्यक्रमात लक्ष्मणने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''याशिवाय यासंदर्भात आणखी एक बाजू आहे आणि ती म्हणजे नाणेफेक. जो संघ दौऱ्यावर असतो तो विजयी व्हावा ही आमची अपेक्षा असते. त्यामुळे चाहत्यांसाठी हा खेळ अधिक मनोरंजक बनतो. "
आयसीसी क्रिकेट समिती २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चार दिवसीय कसोटी सामन्याचा विचार करत आहे.