महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडच्या यशस्वी फिरकीपटूने केली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर - इंग्लंडच्या यशस्वी फिरकीपटू लॉरा मार्शची निवृत्ती

इंग्लंडच्या महिला संघाचे व्यवस्थापकीय संचालक क्लॅर कोनोर यांनी लॉराच्या निवृत्तीविषयी सांगितलं की, 'लॉरानं १३ वर्ष इंग्लंड क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिले. ती इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.'

Laura Marsh has announced her retirement from International Cricket
इंग्लंडच्या यशस्वी फिरकीपटूने केली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

By

Published : Dec 17, 2019, 12:45 PM IST

लंडन - इंग्लंडची महिला फिरकीपटू गोलंदाज लॉरा मार्शने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लॉराने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत २१७ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत. तिनं इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी फिरकीपटूचा मान मिळवला आहे.

इंग्लंडच्या महिला संघाचे व्यवस्थापकीय संचालक क्लॅर कोनोर यांनी लॉराच्या निवृत्तीविषयी सांगितलं की, 'लॉरानं १३ वर्ष इंग्लंड क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिले. ती इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.'

दरम्यान, लॉराने इंग्लंडकडून ९ कसोटी, १०३ एकदिवसीय आणि ६७ टी-२० सामने खेळले आहे. यात तिने कसोटीत २४, एकदिवसीयमध्ये १२९ आणि टी-२० त ६४ गडी बाद केले आहेत. २००९ च्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत लॉराने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details