दिल्ली - सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचे २ सामने सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसरीकडे हलविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वनडे मालिकेतील अखेरचे २ सामने दुसरीकडे हलविण्याची शक्यता - pakistan
मालिकेतील अखेरचे २ सामने सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसरीकडे हलविण्याची शक्यता.
मालिकेतील अखेरचे २ सामने हे मोहाली आणि दिल्ली येथे होणार असून ही २ ठिकाणे पाकच्या सीमेजवळ असल्याने सामने दुसरीकडे खेळवण्यात येवू शकतात. भारत-पाकिस्तान या देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामने हलविण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेतला जाऊ शकतो. तसेच सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने या दोन्ही सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली असली आहे.
भारतीय क्रिकेट संघाला उद्या हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे.