महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जाणून घ्या, भारताच्या पहिल्या शतकवीराबद्दल काही खास गोष्टी

भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ यांचा आज वाढदिवस आहे. सन १९३३-३४ मध्ये झालेल्या या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावा केल्या होत्या. पहिले कसोटी शतक ठोकणारे ते भारताचे पहिले फलंदाज होते.

जाणून घ्या, भारताच्या पहिल्या शतकवीराबद्दल काही खास गोष्टी

By

Published : Sep 11, 2019, 3:24 PM IST

नवी दिल्ली -भारताचा पहिला शतकवीर लाला अमरनाथ यांचा आज वाढदिवस आहे. त्याचे पूर्ण नाव अमरनाथ भारद्वाज होते. सप्टेंबर १९११ मध्ये लाला अमरनाथ यांचा जन्म झाला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लाला अमरनाथ यांनी भारतीय कसोटी क्रिकेटचा डोलारा सांभाळला. सार्वकालिन महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांना हिटविकेट करण्याचा विक्रमही लाला अमरनाथ यांच्या नावावर आहे. या खेळाडूने भारतीय क्रिकेटचे नाव संपूर्ण जगासमोर आणले.

या दिग्गज खेळाडूच्या १९ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी-

  • लाला अमरनाथ यांचा जन्म पंजाबच्या कपूरथळा येथे झाला होता आणि त्यांचे लहानपण लाहोरमध्ये गेले होते.
  • लाला अमरनाथ यांनी १८६ प्रथम श्रेणी सामन्यांत दहा हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत ४६३ बळी मिळवले आहेत.
  • त्यांनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत केवळ एक शतक ठोकले असून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी हे शतक केले होते. हा सामना भारताने गमावला होता.
  • सन १९३३-३४ मध्ये झालेल्या या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावा केल्या होत्या. पहिले कसोटी शतक ठोकणारे ते भारताचे पहिले फलंदाज होते.
  • स्वतंत्र भारताचे ते पहिले कसोटी कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वात भारताने १९५२-५३ मध्ये पाकिस्तानविरुद्धची पहिली अधिकृत कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत भारतीय संघाने २-१ असा विजय मिळविला होता.
  • लाला अमरनाथने यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण २४ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यांनी एकूण ८७८ धावा केल्या आहेत.
  • एका वादामुळे त्यांना १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. १९४६ मध्ये इंग्लंड दौर्‍यासाठी त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळाले होते.
  • ५ ऑगस्ट २००० रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते ८८ वर्षांचे होते. लाला अमरनाथ यांना तीन मुलगे आहेत. सुरिंदर, मोहिंदर आणि राजिंदर हेसुद्धा क्रिकेटपटू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details