नवी दिल्ली - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आपल्या निवृत्तीबाबत 'यू टर्न' घेतला आहे. मार्च २०१९ मध्ये मलिंगाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकानंतर आपण निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तो आता आणखी दोन वर्ष क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहे.
३६ वर्षीय लसिथ मलिंगाने निवृत्ती विषयी बोलताना सांगितले की, 'टी-२० सामन्यात प्रत्येक गोलंदाजाला ४ षटके गोलंदाजी करावी लागते. मी ती व्यवस्थितरित्या करु शकतो. तसेच मी कर्णधार म्हणून अनेक टी-२० सामने खेळलेली आहेत. यामुळे मला वाटतं की मी आणखी दोन वर्ष टी-२० क्रिकेट खेळू शकतो.'
लसिथ मलिंगा आपल्या सहकाऱ्यांसोबत... महत्वाची बाब म्हणजे, लसिथ मलिंगा टी-२० क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. इतकेच नव्हे तर त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक गडी बाद केले आहे. असा कारनामा करणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. मलिंगाने चार चेंडूत चार गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
लसिथ मलिंगा सध्या श्रीलंकेच्या टी-२० संघाचा कर्णधार आहे. पण त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेला विजयापेक्षा जास्त पराभव स्वीकारावे लागले आहेत. मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेने १० टी-२० सामन्यात खेळताना ८ सामने गमावले आहेत. तर एक सामना जिंकला आहे आणि राहिलेला एक सामन्याचे निकाल लागू शकलेले नाही.
हेही वाचा -ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज.. संघ कोलकात्यात दाखल
हेही वाचा -#HBDMilkhaSingh : ...बापाचं छत्र हरवलेल्या पोराचा 'फ्लाईंग सिख' झाला बाप