नवी दिल्ली -आयपीएलच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध नाबाद ६६ धावांची खेळी करणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंगने अर्धशतकी खेळी आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केली आहे. मनदीपने ५६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याने ख्रिस गेलबरोबर शतकी भागीदारी केली. गेल बाद बाद झाल्यानंतरही त्याने संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात नाबाद खेळी करून वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचे मनदीपने सांगितले. सामन्यानंतर मनदीप म्हणाला, "ही खेळी खूप खास होती. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, की प्रत्येक सामन्यात नाबाद राहा. तुम्ही १०० धावा करा अथवा २०० पण तुम्ही बाद नाही झाले पाहिजे.''