अबुधाबी -शेख झायेद स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना खेळवण्यात आला. 'युनिव्हर्स बॉस'च्या तडाखेबंद ९९ धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्ससमोर २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. मात्र, राजस्थानने सांघिक फलंदाजीचे दर्शन घडवत पंजाबवर सात गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यातील एका चुकीमुळे गेलला दोषी ठरवले गेले आहे.
९९ धावा ठोकणाऱ्या ख्रिस गेलला दंड! - ख्रिस गेल आयपीएल दंड न्यूज
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला. त्यानंतर गेलने रागाच्या भरात आपली बॅट फेकली. त्यामुळे त्यामुळे त्याला सामना शुल्काच्या १० टक्के दंड लावण्यात आला आहे.
![९९ धावा ठोकणाऱ्या ख्रिस गेलला दंड! kxip batsman chris gayle fined for code of conduct breach in ipl 2020](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9379667-thumbnail-3x2-dfdfdfd.jpg)
पंजाबच्या डावाच्या २०व्या षटकात राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजी करायला आला. त्याच्या या षटकाच्या तिसर्या चेंडूवर शानदार षटकार खेचल्यानंतर गेलने ९९ धावांवर मजल मारली. गेलला शतक ठोकण्यासाठी फक्त एक धाव घ्यायची होती. पण चौथ्या चेंडूवर आर्चरने त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर रागावलेल्या गेलने आपली बॅट दूरवर फेकली. मात्र तंबूत जाताना त्याने जोफ्रा आर्चरसोबत हात मिळवला.
मात्र, गेलने केलेल्या कृत्यामुळे तो दोषी आढळला. त्याने आयपीएलच्या आचारसंहिच्या २.२ मधील लेव्हल १चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याला सामना शुल्काच्या १० टक्के दंड लावण्यात आला आहे.