कोलंबो -श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराने माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीचा एक जुना किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानचा आहे. त्यावर्षी पावसामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे दोन अंतिम सामने धुवून गेले होते. त्यामुळे भारत आणि श्रीलंका संघाला संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते.
''जेव्हा गांगुली श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जातो...'', संगकाराने सांगितला किस्सा - ganguly in lankan dressing room
एका कार्यक्रमात संगकारा म्हणाला, "या स्पर्धेत सामन्यात गांगुलीचा रसेल अर्नाल्डशी वाद झाला होता. गांगुलीला अंतिम चेतावणी देण्यात आली होती आणि पंचांनी त्यांची तक्रार केली होती. त्यानंतर तो आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आला आणि आमच्याशी बोलला. जर असेच चालू राहिले तर माझ्यावर बंदी घालण्यात येईल, असे तो म्हणाला. आम्ही म्हणालो, कि काळजी करू नका, या प्रकरणाला आम्ही मोठा मुद्दा बनवणार नाही.''

2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात गांगुलीचा रसेल अर्नाल्डशी वाद झाला होता. या सामन्यात अर्नाल्ड सतत खेळपट्टीच्या मध्यभागी धावत होता आणि गांगुली त्याला असे करू नकोस म्हणून सांगत होता. काही वेळानंतर, पंचांना यात हस्तक्षेप करावा लागला.ॉ