अबुधाबी - शेख झायेद मैदानावर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी मात करत दणदणीत विजय मिळवला. गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानच्या खेळाडूंनी नांगी टाकली. मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ट्रोल झाला.
मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्या ट्रोल! - krunal pandya latest news
मागील सामन्यात ५००च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करणाऱ्या कृणाल पंड्याला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याला फलंदाजी करताना १७ चेंडूत १२ धावाच करता आल्या. तर, गोलंदाजीत त्याला एकही विकेट घेता आली नाही. फलंदाजी करताना कृणालच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे तो खूप ट्रोल होत आहे.
![मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्या ट्रोल! krunal pandya trolled for facial expression in ipl match](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9084819-thumbnail-3x2-fffgf.jpg)
मागील सामन्यात ५००च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करणाऱ्या कृणाल पंड्याला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याला फलंदाजी करताना १७ चेंडूत १२ धावाच करता आल्या. तर गोलंदाजीत त्याला एकही विकेट घेता आली नाही. फलंदाजी करताना कृणालच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे तो खूप ट्रोल होत आहे. यापूर्वी, मुंबईचाच क्रिकेटपटू कायरन पोलार्डही असाच ट्रोल झाला होता.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सपुढे सुसाट फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचे खडतर आव्हान होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला १९४ धावांचे आव्हान दिले. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राजस्थानचा संघ १३६ धावांतच गारद झाला. सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.