महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धनुषच्या 'कोलावरी डी'ची 'पांड्या ब्रदर्स'लाही भूरळ, पाहा व्हिडिओ - कोलावरी डी

या व्हिडिओमध्ये, हे दोघे भाऊ 'कोलावरी डी' गाणे गाताना दिसत आहेत.

धनुषच्या 'कोलावरी डी'ची 'पांड्या ब्रदर्स'लाही भूरळ, पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 10, 2019, 8:13 PM IST

नवी दिल्ली -हार्दिक आणि कृणाल हे दोघे टीम इंडियात 'पांड्या ब्रदर्स' म्हणून सर्वांना परिचीत असून ते सध्या विंडीज मालिकेमध्ये व्यस्त आहेत. कृणालला भारताच्या टी-२० तर हार्दिकला सर्व प्रकारात स्थान दिले आहे. या मालिकेदरम्यान, कृणालने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये, हे दोघे भाऊ 'कोलावरी डी' गाणे गाताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेता धनुषनं हे गाणं गायले होतं. २०११ मध्ये आलेल्या या गाण्याला लोकांनी अक्षरश: वेड लावलं होतं. या गाण्यानं धनुषला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळवून दिली. केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात हे गाणे लोकप्रिय झाले होते.

धनुषच्या '३' या चित्रपटातील हे गाणे फक्त २० मिनिंटांमध्ये तयार झाले होते. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने ५ मिनिटांमध्ये या गाण्याला संगीत दिले. धनुषने हे गाणे स्वत: लिहिले आणि गायले होते. आता प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेल्या याच गाण्याला पांड्या ब्रदर्सनं दिलेला आवाज प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरतो, हे पाहणं रंजक ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details