अबुधाबी - मुंबई इंडियन्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव केला. यानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. तसेच त्याने मुंबई इंडियन्सचा गोलंदाजांचे कौतुकही केले.
सामना संपल्यानंतर मॉर्गन म्हणाला, आम्ही प्रथम फलंदाजी करताना काही चुका केल्या. पण, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. तसेच ते स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ कसे आहेत ते दाखवून दिले. आम्हाला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
स्पर्धा मध्यावर आली आली असून ही बदल करण्याची योग्य वेळ आहे. आम्हाला प्रतिस्पर्धी संघ पाहून फलंदाजीचा क्रम बदलावा लागणार आहे. आमचा फलंदाजीचा क्रम मजबूत आहे. पण यात काही बदल आवश्यक आहेत. परिस्थिती पाहून आम्हाला आमचा खेळ करावा लागणार आहे, असेही मॉर्गनने सांगितले.