फ्लोरिडा- भारताने वेस्ट इंडिज विरुध्दचा दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेवर 'कब्जा' केला. या विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरची स्तुती केली. तो म्हणाला, सुंदर भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू ठरु शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे.
रविवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वॉशिग्टन सुंदरने तीन षटके गोलंदाजी केली. त्यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाकले तर एक गडी बाद करण्यासाठी फक्त १२ धावा खर्च केल्या. त्याच्या या कामगिरीवर कर्णधार कोहली आनंदी असून त्याने सुंदरची स्तुती केली आहे.