मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लिऑनने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे कौतुक केले आहे. लिऑनने कोहलीला 'सुपरस्टार' तर पुजारा हा संघाची 'नवीन भिंत' आहे, असे म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, पण कोरोनामुळे बंद असलेल्या स्टेडियमवर हे सामने होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
विराट 'सुपरस्टार', तर पुजारा नवीन 'वॉल' - लिऑन - nathan lyon on virat and pujara news
अशा परिस्थितीत कोहली रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना आणि गोंगाटाच्या आवाजात फलंदाजी करत असेल तर हे कसे होईल याची चर्चा लिऑन करत आहे. ''मी आणि स्टार्क विराट अशा ठिकाणी कसा खेळेल याची चर्चा करत होतो. मात्र, तो सुपरस्टार आहे. तो कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात माहिर आहे'', असे लिऑनने सांगितले.
![विराट 'सुपरस्टार', तर पुजारा नवीन 'वॉल' - लिऑन Kohli superstar and pujara new wall of Indian team said nathan lyon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6790432-1025-6790432-1586867922686.jpg)
विराट 'सुपरस्टार', तर पुजारा नवीन 'वॉल' - लिऑन
अशा परिस्थितीत कोहली रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना आणि गोंगाटाच्या आवाजात फलंदाजी करत असेल तर हे कसे होईल याची चर्चा लिऑन करत आहे. ''मी आणि स्टार्क विराट अशा ठिकाणी कसा खेळेल याची चर्चा करत होतो. मात्र, तो सुपरस्टार आहे. तो कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात माहिर आहे'', असे लिऑनने सांगितले.
मला वाटते की पुजारा आमच्या रडारवर असेल. तुम्हाला कोहली आणि रहाणे यांनाही रोखावे लागेल, असेही लिऑन म्हणाला आहे.