महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेतकरी आंदोलनावर रिहानाचे ट्विट; सचिन-विराटने दिले 'हे' उत्तर - सचिन तेंडुलकर न्यूज

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने केले. यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांनी रिहानाचे नाव न घेता तिला अप्रत्यक्ष सुनावले.

Kohli joins Tendulkar, calls for India's unity
शेतकरी आंदोलनावर रिहानाचे ट्विट; सचिन-विराटने दिले 'हे' उत्तर

By

Published : Feb 4, 2021, 8:46 PM IST

मुंबई - भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने केले. यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांनी रिहानाचे नाव न घेता तिला अप्रत्यक्ष सुनावले.

सचिन तेंडुलकरने काय म्हटलं...

'भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाहेरील शक्ती फक्त बाहेरुन पाहू शकतात पण ते हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल निर्णय घेतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया, अशा आशयाचे टि्वट सचिनने केले आहे. यासोबत त्याने, #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही जोडले आहेत.

विराटने त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलं -

मतभेदाच्या या काळात आपण सर्व एकत्र राहूया. शेतकरी हे आपल्या देशाचे अविभाज्य भाग आहेत. शांततेसाठी आणि पुढे जाण्यासाठी सर्व पक्ष सौहार्दपूर्ण तोडगा शोधून काढतील, याची मला खात्री आहे, अशा आशयाचे टि्वट विराटने केले आहे. यासोबत त्याने #IndiaTogether हा हॅशटॅग जोडला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावीत, ही मागणी घेऊन शेतकरी २६ नोव्हेंबरपासून दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत.

हेही वाचा -भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली

हेही वाचा -शार्दुल-सुंदरची फलंदाजी पाहत होतो तेव्हा डॉक्टरांनी मला बोलावलं.., विराटने सांगितला 'तो' किस्सा

ABOUT THE AUTHOR

...view details