नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या पाच जवानांना श्रद्धांजली वाहिली आहेत. "जे लोक कोणत्याही परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडण्यास विसरत नाहीत ते खरे नायक आहेत. त्यांचा त्याग विसरता येणार नाही. हंदवाडामध्ये आपला जीव गमावलेल्या सैनिक आणि पोलिसांना मी सलाम करतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो'', असे कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर, गंभीरने लिहिले, "खरा नायक कोण आहे? अभिनेता? क्रीडापटू? राजकारणी? नाही. फक्त सैनिक. नेहमी. त्यांच्या आईवडिलांना सलाम. जमिनीवरील सर्वात धाडसी माणूस."