महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वाखाली विरोधी संघांना नऊवेळा डावांनी पराभवाचे पाणी पाजले आहे. तर, भारताचा दिग्गज खेळाडू मोहम्मद अझरूद्दीनने असे आठवेळा केले आहे. हाच मोठा विक्रम आजच्या बांगलादेशवरील विजयामुळे मोडित निघाला. विराटने या विजयासह प्रतिस्पर्ध्यांना दहा वेळा एका डावाने मात दिली आहे.

By

Published : Nov 16, 2019, 5:51 PM IST

शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला!

इंदूर - बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने डावाने विजय साध्य केला. पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशला दारूण पराभव स्विकारावा लागला. या या विजयामुळे कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

हेही वाचा -IPL लिलावापूर्वी 'असे' आहेत संपूर्ण संघ, कोणत्या संघात कोणता खेळाडू वाचा एका क्लिकवर...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वाखाली विरोधी संघांना नऊवेळा डावांनी पराभवाचे पाणी पाजले आहे. तर, भारताचा दिग्गज खेळाडू मोहम्मद अझरूद्दीनने असे आठवेळा केले आहे. हाच मोठा विक्रम आजच्या बांगलादेशवरील विजयामुळे मोडित निघाला. विराटने या विजयासह प्रतिस्पर्ध्यांना दहा वेळा एका डावाने मात दिली आहे.

इंदूरच्या होळकर मैदानावर रंगलेल्या बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला. पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यामुळे भारताला १ डाव आणि १३० धांवांनी हा विजय साध्य करता आला. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुश्फिकुर रहीमने ६४ धावांची चिवट खेळी केली खरी, मात्र दुसऱ्या बाजूला योग्य साथ न मिळाल्याने तो संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरला.

ABOUT THE AUTHOR

...view details