महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वाचा.. इंटरनेटवर सर्वाधिक 'सर्च' केलेला क्रिकेटपटू कोण? - Kohli and Dhoni internet search news

डिसेंबर २०१५ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विराट हा इंटरनेटवर सर्वाधिक 'सर्च' केलेला क्रिकेटपटू ठरला आहे. एसईएलआरएस अभ्यासानुसार याचे संशोधन करण्यात आले. या संशोधनातून मिळवलेल्या माहितीनुसार कोहलीला एका महिन्यात सरासरी १७.६ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे.

Kohli and Dhoni become Most searched cricketer on internet
इंटरनेटवर सर्वाधिक 'सर्च' केलेला क्रिकेटपटू कोण?..वाचा

By

Published : Jan 20, 2020, 8:23 PM IST

नवी दिल्ली - क्रिकेटविश्वात अनेक विक्रम रचलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरील एका विक्रमाने चर्चेत आला आहे. डिसेंबर २०१५ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विराट हा इंटरनेटवर सर्वाधिक 'सर्च' केलेला क्रिकेटपटू ठरला आहे. एसईएलआरएस अभ्यासानुसार याचे संशोधन करण्यात आले. या संशोधनातून मिळवलेल्या माहितीनुसार कोहलीला एका महिन्यात सरासरी १७.६ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे.

हेही वाचा -३० चौकार आणि ५ षटकार....मनोज तिवारीचा 'ट्रिपल' धमाका!

कोहलीनंतर, भारताच्या महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, हार्दिक पंड्या आणि युवराज सिंग या खेळाडूंना इंटरनेटवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले आहे. अव्वल १० जणांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल वगळता इतर सर्व खेळाडू भारतीय आहेत.

इंटरनेटवर सर्वाधिक वेळा सर्च केलेल्या क्रिकेटच्या संघांमध्ये विश्वविजेत्या इंग्लंडचा प्रथम क्रमांक येतो. इंग्लंडच्या संघाला ३.५१ लाख तर, भारतीय संघाला ३.०९ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details