महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रिकेटर श्रीसंतच्या घराला आग, अग्निशामक दलाने काच तोडून परिवाराला काढले बाहेर - क्रिकेटर श्रीसंत

क्रिकेटर एस. श्रीसंत याच्या कोच्चीमधील घराला आग लागली होती. तेव्हा अग्निशामक दलाने श्रीसंतच्या परिवाराला आगीतून बाहेर काढले. सुरुवातीला ही आग बेडरुम आणि हॉलमध्ये लागल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

क्रिकेटर श्रीसंतच्या घराला आग, अग्निशामक दलाने काच तोडून परिवाराला काढले बाहेर

By

Published : Aug 24, 2019, 1:01 PM IST

कोची - भारतीय क्रिकेटर एस. श्रीसंत याच्या कोच्चीमधील घराला आग लागली होती. तेव्हा अग्निशामक दलाने श्रीसंतच्या परिवाराला आगीतून बाहेर काढले. सुरुवातीला ही आग बेडरुम आणि हॉलमध्ये लागल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. तेव्हा घरात श्रीसंत याची पत्नी, दोन मुली आणि २ कामगार हजर होते. श्रीसंत यावेळी घरी उपस्थित नव्हता.

सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनूसार, शेजाऱ्यांनी श्रीसंतच्या घरामधून धूर येत असताना पाहिले. तेव्हा त्यांनी अग्निशामक दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. यावर अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत श्रीसंतच्या परिवाराला पहिल्या मजल्यावर असलेली काच तोडून बाहेर काढले आणि आग विझवली. या आगीत बेडरुममधील साहित्याचे नुकसान झाल्याचे समजते.

आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी श्रीसंत आढळला होता. तेव्हा त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अखेर बीसीसीआयकडून त्याला काही दिवसांपूर्वीच दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश बीसीसीआयला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. यावर लोकपाल डी. के. जैन यांनी निर्णय देत श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवली. यामुळे त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details