शारजाह -कोलकाता नाईट रायडर्सचा कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात देवदत्त पडीक्कलला बाद करत रसेलने ही कामगिरी केली. या सामन्यात बंगळुरूने कोलकाताला ८२ धावांनी पराभूत केले.
टी-२० स्वरूपात ३०० बळी घेणारा रसेल जगातील दहावा गोलंदाज आहे. ३३७व्या टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो ५०० बळींसह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा दुसर्या स्थानावर आहे.