महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : कोरोनाचे सावट असताना KXIP च्या खेळाडूंची बीचवर मौजमस्ती, पाहा व्हिडिओ - Kings XI Punjab Players Training

किंग्ज इलेव्हन पंजाबचे खेळाडू क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर मौजमजा करताना दिसून येत आहेत. खेळाडूंच्या मस्तीचा एक व्हिडिओ पंजाब फ्रेंचायझीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

Kings XI Punjab Players Enjoy Downtime Amid IPL 2020 Training On A Private Beach
IPL 2020 : कोरोनाच्या सावट असताना KXIP च्या खेळाडूंची बीचवर मौजमस्ती, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 2, 2020, 2:44 PM IST

Updated : Sep 2, 2020, 3:08 PM IST

दुबई- एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सीएसकेच्या संघात भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचे खेळाडू क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर मौजमजा करताना दिसून येत आहेत. खेळाडूंच्या मस्तीचा एक व्हिडिओ पंजाब फ्रेंचायझीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दरम्यान, व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाबने 'ट्रेनिंग के बीच थोडा फन जरुरी है', असे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात खेळाडू बीचवर मस्ती तसेच रनिंग करताना पाहायला मिळत आहेत. तर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे फोटोग्राफी करताना दिसून येत आहे.

दरम्यान, पंजाबच्या खेळाडूंनी या मौजमस्तीशिवाय संघाच्या सराव सत्रात घाम गाळला. आयपीएलच्या या हंगामात पंजाब संघाची धुरा केएल राहुलकडे आहे. राहुलचे आयपीएल करियर पाहता त्याने ६७ सामने खेळले आहेत. यात १६ अर्धशतकं आणि एका शतकासह त्याने १९७७ धावा केल्या आहेत.

मागील हंगामात राहुलने १४ सामन्यात खेळताना ५९३ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम राहुलच्या नावे आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळताना १४ चेंडूत अर्धशतक केले होते. यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार खेचले होते.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले असून सीएसकेचा संघ वगळता सर्व संघातील खेळाडूंनी सरावाला सुरूवात केली आहे.

IPL २०२०: सीएसके चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; धोनीसह सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह

Last Updated : Sep 2, 2020, 3:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details