चंदीगड - आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबने पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवांनाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील वीरमरण आलेले सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना ही मदत करण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना किंग्ज इलेव्हन पंजाबची मदत - किंग्ज इलेव्हन पंजाब
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले होते.
किंग्ज इलेव्हन पंजाब
संघाचा कर्णधार रविंचंद्रन अश्विन आणि सीआरपीएफच्या उप महानिरीक्षक वीके कौंदल यांच्या उपस्थितीत वीरमरण आलेले जवान जयमल सिंह, सुखजिंदर सिंह, मनिंदर सिंह, कुलविंदर सिंह आणि तिलक राज यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला.
यापूर्वीच भारतीय क्रिकेट बोर्डाने वीरमरण आलेल्या जवानांना २० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. हा धनादेश २३ मार्च रोजी देण्यात येणार आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले होते.