जमैका - मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डने सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) वादळी खेळी केली आहे. सीपीएलमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या पोलार्डने २७ चेंडूत ७२ धावा ठोकत संघाला बार्बाडोसवर शानदार विजय मिळवून दिला.
VIDEO : मुंबई इंडियन्सच्या पोलार्डचा सीपीएलमध्ये झंझावात, २७ चेंडूत ठोकल्या ७२ धावा
बार्बाडोसच्या १४९ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघाची अवस्था अतिशय बिकट झाली. लेंडल सिमन्सच्या ३२ धावा वगळता पहिले सहा फलंदाज अपयशी ठरले. मात्र, पोलार्डने अवघ्या २८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७२ धावा कुटल्या.
बार्बाडोसच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रिनबागो नाइट रायडर्स २ गडी राखून विजय नोंदवला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघाची अवस्था अतिशय बिकट झाली. लेंडल सिमन्सच्या ३२ धावा वगळता पहिले सहा फलंदाज अपयशी ठरले. मात्र, पोलार्डने अवघ्या २८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७२ धावा कुटल्या. विजयासाठी ८ धावांची गरज असताना पोलार्ड बाद झाला. पण तळाच्या फलंदाजांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, बार्बाडोसने जॉनसन चार्ल्स (४७) आणि कायल मेयर्स (४२) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ७ गडी गमावून १४८ धावा केल्या.