नवी दिल्ली -भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित केल्याबद्दल खूष आहे. यंदाचे आयपीएल मार्चमध्ये सुरू होणार होते, मात्र कोरोनामुळे ते स्थगित करावे लागले यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयावर श्रीकांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. ''आयपीएल होणार आहे, हे ऐकून मला आनंद झाला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमन पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे'', असे श्रीकांतने ट्विटरवर सांगितले.