लंडन - इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या किया महिला सुपर लीगमध्ये भारतीय महिला क्रिकेट संगाची युवा स्फोटक फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने नाबाद शतक ठोकले. १८ वर्षीय रॉड्रिग्सने अवघ्या ५८ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ११२ धावा ठोकल्या. रॉड्रिग्जने ठोकलेले शतक किया महिला सुपर लीग टी-२० लीग मध्ये जलद शतक ठरले आहे.
भारतीय महिला खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्जचे महिला सुपर लीगमध्ये सर्वात जलद शतक - jemimah rodrigues
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या किया महिला सुपर लीगमध्ये भारतीय महिला क्रिकेट संगाची युवा स्फोटक फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने नाबाद शतक ठोकले. १८ वर्षीय रॉड्रिग्सने अवघ्या ५८ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ११२ धावा ठोकल्या. रॉड्रिग्जने ठोकलेले शतक किया महिला सुपर लीग टी-२० लीग मध्ये जलद शतक ठरले आहे.
रॉड्रिग्जच्या शतकी खेळीच्या जोरावर यॉर्कशायर डायमंड्स संघाने शेवटच्या बॉलवर सदर्न वायपर्स संघाचा ४ गडी राखून पराभव केला. वायपर्सने प्रथम फलंदाजी करतान निर्धारित २० षटकामध्ये ४ गडी बाद १८४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यॉर्कशायरने अंतिम चेंडूवर ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. रॉड्रिग्जला तिच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
जेमिमाह रॉड्रिग्ज याची ही खेळी परदेशी टी-२० लीगमधील भारतीय महिला खेळाडूची ही सर्वोच्च खेळी ठरली आहे. याआधी हा विक्रम भारतीय महिला संघाची स्फोटक सलामीवीर स्मृती मानधना हिच्या नावावर होता. २०१८ मध्ये किआ सुपर लीगमध्ये मानधना हिने शतक केले होते.