कराची -पाकिस्तानच्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत पाकिस्तानचा फलंदाज खुश्दिल शाहने आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवला. साउदर्न पंजाबकडून खेळत खुश्दिल शाहने सिंध संघाविरुद्ध केवळ ३५ चेंडूत शतक ठोकले. खुश्दिलच्या शतकी खेळीच्या जोरावर साउदर्न पंजाबने विजय मिळवला. जेव्हा खुश्दिल फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या संघाचे ४३ धावांत ४ फलंदाज तंबूत परतले होते.
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची कमाल...35 चेंडूत ठोकले शतक! - fastest century in t20 latest news
पाकिस्तानकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा खुश्दिल पहिला तर, जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. टी-२० मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने २०१३ मध्ये ३० चेंडूत शतक झळकावले होते. खुश्दिलने आपला सहकारी अहमद शहजादचा विक्रम मोडला.

अहमद शहजादने टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी ४० चेंडूत शतक केले होते. टी-२० क्रिकेटमध्ये ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्मा, डेव्हिड मिलर आणि मार्टिन गुप्टिल यांच्याही नावावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने ३२ चेंडूत शतक साकारले आहे. तर, विहान लुबे (३३) आणि अँड्र्यू सायमंड्स (३४) यांनी टी-२०मध्ये वेगवान शतक केले आहे.