मुंबई - छत्तीसगडच्या रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंग्लंड संघाची धुरा केव्हिन पीटरसकडे असणार आहे. तर, खालीद महमूद बांगलादेश लेजेंड्स संघाचे नेतृत्व करेल. मॅथ्यू हॉगार्ड, ओवेस शाह, माँटी पानेसार आणि निक क्रॉम्पटन हे इंग्लंड लेजेंड्स संघातील इतर महत्त्वाचे खेळाडू आहेत. बांगलादेश संघात नफीज इक्बाल, अब्दुर रझाक आणि मोहम्मद रफिक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
५ मार्च ते २१ मार्च यादरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड लेजेंड्सचा संघ शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीहून रायपूरला जाणार आहे. बांगलादेशचा संघ शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी ढाका येथून कोलकातामार्गे रायपूरला पोहोचेल. एजुकेशन टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म अनअॅकॅडमी ही लीगची शीर्षक प्रायोजक आहे, तर व्हायकॉम १८ हे प्रसारण भागीदार आहेत.