मुंबई - ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम असल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने म्हटले आहे. झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक पॉमी एमबांग्वासमवेत झालेल्या संवादात पीटरसने आपली प्रतिक्रिया दिली.
सचिन आणि स्मिथपेक्षा विराट उत्तम - पीटरसन - kevin pietersen latest news
पीटरसन म्हणाला, “कोहली एक महान फलंदाज आहे. दडपणाखाली असलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली स्मिथपेक्षा सरस आहे. यासाठी मी माझ्या पुस्तकात सचिनपेक्षा कोहलीला जास्त पसंती दिली आहे.”
पीटरसन म्हणाला, “कोहली एक महान फलंदाज आहे. दडपणाखाली असलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली स्मिथपेक्षा सरस आहे. यासाठी मी माझ्या पुस्तकात सचिनपेक्षा कोहलीला जास्त पसंती दिली आहे.”
सचिन आणि विराट यांच्यापैकी कोणाची निवड करशील, या प्रश्नाला उत्तर देताना पीटरसन म्हणाला, ‘‘अर्थात विराटची. धावांचा पाठलाग करण्याचे त्याचे कौशल्य कौतुकास्पद आहे. दुसऱ्या डावातील फलंदाजीची त्याची सरासरी ८०हून अधिक आहे. त्याने अधिक शतके दुसऱ्या डावातच केलेली आहेत. दुसर्या डावात फलंदाजी करताना सचिनचे सरासरी ४२.३३ तर कोहलीची सरासरी ६८.३३ आहे.
TAGGED:
kevin pietersen latest news