महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

''पाकिस्तानला मदत करा'', पीटरसनने केले आवाहन - kevin pietersen latest news

पीटरसनने पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांच्या कामाचे कौतूक केले आहे. त्याने ट्विट करुन त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत, तो म्हणाला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देशाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करत आहेत आणि सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंब्याची आवश्यकता आहे.

kevin pietersen appeals for help to Pakistanis living abroad
''पाकिस्तानला मदत करा'', पीटरसनने केले आवाहन

By

Published : Apr 13, 2020, 6:18 PM IST

लंडन -इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने पाकिस्तानच्या मदतीसाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना आवाहन केले आहे. ही मदत पाकिस्तानच्या पंतप्रधान मदत निधीसाठी करावी असे पीटरसनने सांगितले आहे.

पीटरसनने ट्विटरवर हे आवाहन केले. तो म्हणाला, की पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान आपल्या देशाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करत आहेत आणि सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंब्याची आवश्यकता आहे.'

तो पुढे म्हणाला, "पाकिस्तानमधील या गंभीर परिस्थितीत मी थोडेशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील सर्व लोक पाकिस्तानसाठी हातभार लावत आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. इम्रान खान आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. पंतप्रधान मदत निधीसाठी देणगी देऊन त्यांची मदत करा."

आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या 5000 रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि 93 लोकांचा बळी गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details