मुंबई - जॅक लीच आणि जेम्स अँडरसन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना २२७ धावांनी जिंकला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्याच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताच्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केविन पीटरसन याने, त्याच्या मागील ट्विटचा हवाला देत विराट सेनेला डिवचलं आहे.
भारताच्या पराभवानंतर केविन पीटरसन याने हिंदीतून ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटलं की, 'इंडिया, आठवण आहे का जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. तेव्हा मी तुम्हाला एक इशारा दिला होता. त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की जास्त आनंद साजरा करू नका म्हणून.'
काय म्हटलं होत पीटरसनने त्याच्या पहिल्या ट्विटमध्ये...
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ ने जिंकली. त्यानंतर त्याने एक ट्विट करत भारतीय संघाला एक इशारा दिला होता. भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे. परंतु खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे. त्याला तुम्हाला तुमच्या घरात पराभूत करावे लागणार आहे. सतर्क रहा. दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा, अशा आशयाचे ट्विट पीटरसनने केले होते.
दरम्यान, केविन पीटरसन याने भारतीय संघाला डिवचलं आहे. आता पुढील कसोटीत भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा -IND vs ENG : अजिंक्यला संघातून वगळणार का? प्रश्नावर विराट संतापला, म्हणाला...
हेही वाचा -IND VS ENG : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहली म्हणाला...