बार्बाडोस - विंडीजचा अनुभवी गोलंदाज केमार रोच इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या कंबरेला दुखापत झाली आहे. ८० सामने खेळणार रोच विंडीजच्या गोलंदाजीचे नेतृत्व करतो. विंडीज बोर्डाला आशा आहे की, रोच विश्वचषकापूर्वी फिट होईल.
WI vs ENG: केमार रोच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर - kemar roach
बोर्डाने त्याच्या जागी कोणत्याच खेळाडूला संधी दिली नाही. आंद्रे रसेलला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

बोर्डाने त्याच्या जागी कोणत्याच खेळाडूला संधी दिली नाही. आंद्रे रसेलला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. रोचने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भेदक गोलंदाजी केली होती. त्याने १८ बळी घेऊन विंडीजला मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्याला मालिकावीरचा किताब देण्यात आला. ही कसोटी मालिका विंडीजने २-१ अशी जिंकली होती.
रोच आधी एविन लुईस आणि कीमो पॉल हेदेखील खेळाडू जायबंदी झाले आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा पराभव झाला आहे. विंडीजमध्ये मे महिन्यात विंडीज आर्यंलंड आणि बांगालादेश यांच्यात त्रिकोणीय मालिका होणार आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी विंडीजसाठी ही चांगली संधी आहे.