बंगळुरु - कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये काल शुक्रवारी (२३ ऑगस्ट) रोजी झालेल्या बेल्लारी टस्कर्स विरुद्ध शिवमोग्गा लायन्स हा सामन्यात सामना लक्षणीय ठरला. या सामन्यात कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी तर केलीच पण त्यासोबत त्याने गोलंदाजीतही कमाल केली. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील ८ गडी बाद केले.
कृष्णप्पाची कमाल..! ५६ चेंडूत १३४ धावा, त्यानंतर घेतल्या ८ विकेट - Karnataka Premier League 2019
कृष्णप्पा गौतमने बेल्लारी टस्कर्सकडून खेळताना ५६ चेंडूत तडाकेबाज १३४ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि १३ षटकार लगावले. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत शिवमोग्गा लायन्सचे अवघ्या १४ धावांमध्ये ८ गडी बाद केले.

गौतमने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बेल्लारीने हा सामना ७० धावांनी जिंकला. सुरवाताली बेल्लाने १७ षटकांत ३ बाद २०३ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या शिवमोग्गाला १३३ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, कृष्णप्पाने गौतमने कर्नाटक प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येसह गोलंदाजीतही सर्वोत्तम कामगिरी केली.